कोल्हापूर विमानतळावर रात्री
विमान उतरविण्यास मंजुरी

कोल्हापूर – कोल्हापूर विमानतळावर २० एप्रिलपासून आता रात्री विमान उतरवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ७५ आसन क्षमतेच्या विमानांचे रात्रीच्या वेळी लँडिंग करता येणार आहे. त्यामुळे आता रात्रीही प्रवासी सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालयाने ही मंजुरी दिल्याने आता मोठी विमाने रात्रीचा मुक्कामही कोल्हापुरात करू शकणार आहेत.

प्रामुख्याने कोल्हापुर विमानाचे विस्तारीकरण सूरु आहे. येथे धावपट्टी, एटीसी टॉवर, पार्किंगची कामे सुरु आहेत. त्यामुळे नाईट लँडिंग सुरु करण्यात आले असले, तरी येथे धुके, पाऊस यामुळे विमानसेवेवर परिणामाची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर आता लवकरच डिव्हिआर प्रणाली बसविण्यात येणार आहे. जेट सारख्या विमानांचे यशस्वी लँडिंग करण्यासाठी नुकतीच येथे आयएफआर यशस्वी चाचणी झाली. त्यामुळे आता विमानतळावर ७५ आसन क्षमतेचे एम्ब-१७५ अशा जेट विमानासारखी ताशी ६०० कि.मी. वेगाची मोठी विमाने रात्रीही उतरवता येणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूर-दिल्ली, कोलकत्ता अशा लांब अंतराचीही ही विमानसेवा सुरु होणार आहे.

Scroll to Top