Home / News / कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवा २७ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर-कोल्हापूरहून गुजरातला नियमितपणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर- अहमदाबाद ही नियमित विमानसेवा सुरू होणार आहे . खासदार महाडिक यांनी...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर-कोल्हापूरहून गुजरातला नियमितपणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर- अहमदाबाद ही नियमित विमानसेवा सुरू होणार आहे . खासदार महाडिक यांनी सांगितले की, सोमवार, गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी ही सेवा सुरू राहणार असून कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता विमान उड्डाण करेल आणि १२ वाजून २० मिनिटांनी अहमदाबादला पोहचेल. स्टार एअर लाईन कंपनीचे सुमारे ५० आसन क्षमतेचे विमान असून तिकिटाचे बुकिंग सुरू झाले आहे. कोल्हापूर- तिरूपती विमानही सेवा सुरू झाली आहे. नागपूर, गोवा तसेच दिल्ली मार्गावर थेट विमानसेवा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या