कोल्हापूर – कोल्हापुरी चप्पल आता प्रदेशातील लोकांनाही खुणावत आहे. चामड्यापासून हाताने बनवले जात असल्याने त्याला नैसर्गिक जोड आहे.
वातावरणातील उष्णतेपासून शरीराला गारवा देण्यात कोल्हापुरी चप्पलचा बोलबाला आहे. आता कोल्हापुरी चपलांना पाकिस्तानातून मायणी वाढली आहे.
पाकिस्तानी नागरिकांना कोल्हापुरी चप्पलचे आरोग्यदायी महत्त्व पटले आहे. पाकिस्तानमधील अतिउष्ण भागातील नागरिकांना कोल्हापुरी चप्पलचा गारवा भावला आहे. तसेच या चप्पलची बांधणी करत असताना वापरल्या जाणार्या तेलामुळे मऊपणा त्वचेसाठी चांगला असल्याने पाकिस्तानातून कोल्हापुरी चप्पलला मागणी वाढत आहे.या चपलांच्या विणकामासाठी वापरले जाणारे रंगीत धागे,तसेच विविध रंगांच्या पॉलिशमधील कोल्हापुरीची खरेदी पाकिस्तानी महिलांकडून केली जात आहे.कोल्हापुरी चप्पलला येणार्या मागणीत पाकिस्तानचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये आहे.पाकिस्तानातील लाहोर हे कोल्हापुरी चप्पल पाठवण्याचे मुख्य केंद्र असून तेथून या चप्पलचे ग्राहकांना वितरण केले जाते.