कोल्हापुरात रक्ताची टंचाई अवघ्या ११ पिशव्या शिल्लक

कोल्हापूर – गेल्या काही दिवसांपासून शहरातील सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ब्लड बँकेत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. सीपीआरची ब्लड बँक मध्ये अवघ्या ११ पिशव्या शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कार्यकर्ते गुंतले आहेत. त्यामुळे रक्तदान शिबिरे झालेली नाहीत.परिणामी जिल्ह्यातील शासकीय २ आणि खासगी ११ अशा एकूण १३ ब्लड बँकांत रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.

सीपीआरमध्ये दररोज १५००, तर महिन्याला ३५ ते ४० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. अतिगंभीर रुग्णांना व काही विभागांतील नियमित रुग्णांना रक्तपुरवठा करावा लागतो. दररोज ५० ते ६० रक्ताच्या पिशव्या लागतात.एका रक्ताच्या पिशवीत ३५० मिलिलिटर रक्त असते.अशा १२०० ते २००० रक्त पिशव्यांची गरज दर महिन्याला लागते. सीपीआरमधील रुग्णांना सीपीआर ब्लड बँकेतून रक्त पुरवले जाते. पण आता रक्त पुरवठा फारच कमी आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top