कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसाचा गळीत ऊस हंगामाला तडाखा बसला. या पावसाचा सगळ्यात अधिक फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालकांना बसला आहे. ऊसाचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहेत.
ग्रामीण भागात धुवाधार पाऊस पडल्याने पिके, फळबागांना बसला. ऊसाच्या फडामध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. चिखलामुळे ऊसतोड यंत्रासह वाहन ऊसाच्या फडात जाऊ शकत नाहीत. तोडलेला ऊस डोक्यावरून वाहून नेण्यासाठी मजुरांना जास्त पैसे द्यावे लागत आहेत.