चंदगड – कोल्हापूर आगारातील एसटी बस खाली चिरडून दत्तू तुकाराम साबळे(५०) यांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड सातवणे जवळ समोरून येणाऱ्या दुचाकी स्वराला वाचवताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यावेळी बसची वाट पाहत उभे असलेले साबळे बसच्या चाकाखाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय शाळेला जाण्यासाठी बस स्थानकावर थांबलेल्या शुभम गावडे, सिद्धेश ठोकडे, कुणाल कांबळे आणि वैभव कोंडुसकर या चौघांना बसने धडक दिली. या अपघातात हे चार जण जखमी असून त्यांच्यावर चंदगड तालुक्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोल्हापुरात एसटीखाली चिरडून एकाचा मृत्यू
