वॉशिंग्टन –
डोनाल्ड ट्रम्प दुसर्यांदा सत्तेवर येताच अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने आसा दावा केला आहे की, कोविड-१९ हा विषाणू नैसर्गिक नव्हता. त्याची उत्पत्ती ही प्रयोगशाळेतून झाली होती. ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळातही त्यांनी कोरोनासाठी चीनला जबाबदार धरले होते.
सीआयएनेआपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, कोविड-१९ विषाण नैसर्गिक नव्हता तर त्याचा उमग प्रयोगशाळेत झाला होता. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ सीआयएने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. बायडेन प्रशासन आणि सीआयएचे माजी संचालक विल्यम बर्न्स यांच्या आग्रहाखातर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्या सूचनेनुसार ही घोषणा करण्यात आली.
चीनने सीआयएचे आरोप फेटाळले असून चीनच्या अधिकाऱ्यांनी कोविड-१९ च्या उत्पत्तीबद्दलची अटकळ “अवैज्ञानिक आणि राजकीय हेतूने प्रेरित” असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यू म्हणाले की, या विषाणूच्या उगमस्थानाचे राजकारण आणि बदनामी करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. पुन्हा एकदा मी सर्वांना विज्ञानाचा आदर करून कटकारस्थानांपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.