बिजींग-कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात खळबळ माजवून दिल्याचा अनुभव ताजाच असतानाच आता चीन मध्ये आणखी एक धोकादायक विषाणू आढळला आहे. या विषाणूच्या संसर्गाने एक व्यक्ती कोमात गेल्याने जगाची चिंता वाढली आहे.चीनच्या आरोग्य विभागाला मंगोलिया मध्ये हा विषाणू आढळला आहे. चीनच्या झिनजाऊ शहरातील एका ६१ वर्षीय व्यक्तीला पाच दिवसांपूर्वी टिक हा किडा चावला होता. त्यानंतर तो अचानक आजारी पडला. त्याची तपासणी केली असता त्याला आर्थोनेरोवारसची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. या विषाणूमुळे रुग्णाला आधी ताप आला. त्यानंतर या विषाणूने व्यक्तीच्या मेंदूवरही परिणाम केला. त्यामुळे रुग्ण कोमात गेला आहे. या विषाणूच्या संक्रमणावर चीनने आता लक्ष केंद्रीत केले आहे.
कोरोनानंतर चीनमध्ये आढळलानवा विषाणू! जगाची चिंता वाढली
