पाटण – मागील तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणाची साठवण क्षमताच संपली आहे. त्यामुळे धरणाच्या सहापैकी दोन वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात आले आहे.
या धरणाच्या सहापैकी २ वक्र दरवाजातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण ४२३२ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने कोयना धरणात अपेक्षित पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.त्यामुळे पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न वर्षभरासाठी मिटला आहे.