कराड- महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या पाटणच्या कोयना धरणातील पाणीसाठा १००.३८ टीएमसी इतका झाला आहे.त्यानंतर आता आगामी पावसाची शक्यता आणि या धरणाची साठवण क्षमता लक्षात घेता या धरणातून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रकल्प प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कोयना धरणाची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून सध्या १००.३८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ४.८७ टीएमसी इतक पाणी आवश्यक आहे.सध्या या धरणात प्रति सेकंद सरासरी ४१,२६५ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे.त्यामुळे आगामी काळातील पाऊस आणि पाणी साठवण क्षमता लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाने काल सकाळी २० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करून धरणाचे सहा वक्री दरवाजे १ फुट ३ इंचाने उचलले.सध्या या धरणातून
प्रतिसेकंद १२,४५५ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामध्ये कोयना नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.