कराड : कोयना धरणात आज सकाळी आठ वाजता ८१.१९ टीएमीसी इतकी पाणीसाठ्याची नोंद आली. यावेळी धरणातून सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे.
त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी सहा वक्र दरवाजाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ करून ४० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला. धरणातील पाण्याच्या साठ्यानुसार त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. कोयना धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्यूसेक विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२ हजार १०० क्यूसेक इतका झाला आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने सातारा जिल्हा प्रशासनाकडून नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.