कोयना धरणाचे दरवाजे उघडल्याने सतर्कतेचा इशारा

सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवकही वाढली आहे. त्यामुळे आज दुपारी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ६ फूटापर्यंत उघडण्यात आले आहेत.कोयना धरणाचे दरवाजे उघडून सांडव्यावरून आणि पायथ्याच्या विद्युत गृहातून कोयना नदीतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्याचबरोबर धोम धरणातून कृष्णा नदीत तर वीर धरणातून नीरा नदीतही पाणी सोडण्यात आले. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा नदीकाठावरील गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनालाही याबाबतची माहिती देण्यात आली असून सखल भागातील लोकांचे स्थलांतर, पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top