कोयना धरणाचा पाणीसाठा ९० टीएमसीवर पोहचला!

पाटण – सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळ पडला होता , पण यंदा वरुणराजाने कृपा केल्याने समाधानाची स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कोयनानगरला अधिक पाऊस झाला असून आज कोयना धरणाचा पाणीसाठा ९० टीएमसीवर पोहचला आहे.
नवजामध्ये तर पावसाने ५ हजार मिलिमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे.

ह छोट्या नद्या,ओढे व नाल्यांमधून प्रतिसेकंद सरासरी ९,८७६ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणाच्या एकूण १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्यापैकी आता ९० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे १५.२५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना तांत्रिक जलवर्षात आत्तापर्यंत कोयना ४,२७३ मिलिमीटर, नवजा ५,०६३ मिलिमीटर, महाबळेश्वर ४,८२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या ९० टीएमसी उपलब्ध तर ८५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून मागील चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात ०.९१ टीएमसीने व पाणी उंचीत ८ इंचाने वाढ झाली आहे. शनिवार संध्याकाळी पाच ते रविवार संध्याकाळी पाच या चोवीस तासात कोयना १४ मिलिमीटर,नवजा २६ मिलिमीटर तर महाबळेश्वर २२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top