*५४ घरे बांधण्यासाठी
मागविल्या निविदा !
मुंबई- दक्षिण मुंबईतील फोर्ट भागातील कोचीन स्ट्रीटवरील पालिका वसाहतीच्या पुनर्विकासात दोन इमारतींचा विस्तार केला जाणार आहे . या इमारतींच्या बाजूच्या जागेत कामगारांसाठी ५४ घरे बांधली जाणार आहेत. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या आहेत.त्यामुळे गेली काही वर्षे रखडलेले हे पुनर्विकासाचे काम लवकर मार्गी लागण्याची शक्यता आहे.
पालिकेच्या सफाई कामगारांच्या घरांसाठी आश्रय योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात १२ हजार घरे बांधली जाणार आहेत. या योजनेंतर्गत सीएसएमटी येथील फोर्ट भागातील कोचीन स्ट्रीटवरील पालिका वसाहतीच्या पुनर्विकासात आतापर्यंत सुमारे ८६ कामगारांना घरे मिळाली आहेत.यामध्ये सीएस क्रमांक १९९७ धारण करणाऱ्या प्लॉटवर दोन पुनर्विकास इमारती बांधल्या जाणार आहेत.याच इमारतींच्या बाजूला असलेल्या एमबीटी प्लॉटवर विस्तारित इमारती बांधण्याचे प्रस्तावित आहे.यात ५४ घरे बांधली जाणार आहेत.ही घरे २३८ चौरस फुटांची असणार आहेत.