कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात

रत्नागिरी – कोकणात पारंपरिक शिमगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. कोकणात ८ ते १० दिवस शिमगोत्सव उत्साहात साजरा होतो. त्याप्रमाणे काल गावागावांत वाडी-वस्तीवर होळ्यांचे विधिवत पूजन आणि पहिला होम करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १,३१५ सार्वजनिक आणि २,८५४ खासगी होळी उभारण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात १ ,३१५ ठिकाणी सार्वजनिक आणि २,८५४ खासगी होळी उभारण्यास प्रारंभ झाला आहे. गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्या सजल्या आहेत. पुढील पंधरा दिवस ग्रामदेवतांच्या पालख्या गावात घरोघरी फिरवल्या जातील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top