मुंबई – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जुलै ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.जिल्ह्यांत बहुतांश भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच या कालावधीत समुद्र किनाऱ्यालगत ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.त्यामुळे मच्छिमारांनी सतर्क रहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे,कल्याण – डोंबिवली,नवी मुंबई, पालघर परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांतही आज मुसळधार पाऊस पडला.
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सकाळपासून सुरू होती.त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. पोलादपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. येथे पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीतील गुहागरमध्ये पावसचा कहर आजही पावसाचा कहर सुरू राहिला. नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पालघर, ठाणे जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस पडला.