सावंतवाडी- बदलते हवामान,थंडीचा लहरीपणा आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे कोकणातील नारळाचे उत्पादन कमालीचे घटले आहे.त्यामुळे आता स्थानिक बाजारपेठेत नारळांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.नारळाच्या दराने पन्नाशी पार केली आहे.
सध्या सुरू असलेले विविध धार्मिक सण, गावोगाच्या जत्रा यामुळे बाजारपेठेत नारळाला मोठी मागणी आहे.परंतु नारळाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.सध्या लहानात लहान नारळ ३० ते ३५ रुपये, मध्यम नारळ ४० ते ४५ रुपये व मोठा नारळ ५० ते ६० रुपये दराने विक्री केला जात आहे. सहा महिन्यांपूर्वी याच नारळाची किंमत सरासरी १८ ते २५ रूपये एवढी होती. म्हणजेच नारळच्या दरात दुप्पटीने वाढ झाली आहे. कोकणात स्वयंपाकासाठी नारळाचा सर्रास वापर होतो. मात्र नारळाचे दर वाढल्याने नारळाचा वापर कमी करायचा आहे.
कोकणात नारळाच्या दराने पन्नाशी ओलांडली
