Home / News / कोंडेश्वर धबधबा परिसर २ महिने पर्यटनासाठी बंद

कोंडेश्वर धबधबा परिसर २ महिने पर्यटनासाठी बंद

ठाणे – बदलापूरजवळचा कोंडेश्वर धबधबा परिसर पुढील दोन महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे.या धबधब्याच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू...

By: E-Paper Navakal

ठाणे – बदलापूरजवळचा कोंडेश्वर धबधबा परिसर पुढील दोन महिने पर्यटनासाठी बंद राहणार आहे.या धबधब्याच्या एक किमी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी हे आदेश लागू केले आहेत.

कोंडेश्वर धबधब्यावर जाण्यास,पाण्याच्या प्रवाहाखाली बसण्यास, पाण्यात उतरण्यास आणि तिथे पोहण्यास पुढील दोन महिने बंदी करण्यात आली आहे.या धबधब्यासह भोज,दहिवली,आंबेशिव नदी,चंदेरी गड,चांदप, आसनोली नदी आणि बारवी नदी आदी ठिकाणी ३० ऑगस्टपर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू असणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी,
मुरबाड,कल्याण, शहापूर आणि अंबरनाथ आदी तालुक्यातील पर्यटनस्थळांनाही हे प्रतिबंधात्मक आदेश लागू असतील,असे ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या