वॉशिंग्टन : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमध्ये सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले असताना आता कॉग्निझंट या यूएस स्थित आयटी कंपनीने ३,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही देखील बंद करणार आहे.
अमेरिकेसह युरोपीय देशांत असलेल्या मंदीचा परिणाम आयटी कंपन्यांच्या नफ्यावर झाला आहे. कॉग्निझंट यूएसमध्ये स्थित आहे, परंतु भारताच्या कामकाजाचा मोठा भाग कॉग्निझंटमध्ये आहे. सध्यस्थितीत ३ लाख ५५ हजार ३०० कर्मचारी आहेत. कॉग्निझंटने वार्षिक आधारावर नफ्यात किरकोळ ३% वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी, कंपनीचा महसूल ४.८१ अब्ज झाला. शिवाय, कॉग्निझंटचे मार्जिन सध्या १४.०६ टक्के आहे. हे आयटी उद्योगातील सर्वात कमी मार्जिन आहे. एकूणच कंपनीच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे कंपनीवर खर्चात कपात करण्याचा दबाव वाढला आहे.
खर्च कमी करण्यासाठी कंपनी आपली काही कार्यालयेही बंद करणार आहे. कॉग्निझंट ही एकमेव टेक कंपनी नाही ज्याने अलीकडे टाळेबंदीची घोषणा केली आहे. विप्रो, अॅमेझॉन, ऍक्सेंचर, इन्फोसिस, आयबीएम, गुगल आणि ट्विटर यांसारख्या कंपन्यांनीही गेल्या काही महिन्यांत कर्मचारी कपात केली असतानाही फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सएपची मूळ कंपनी मेटा १०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. ही कपात या महिन्यापासून म्हणजेच मे महिन्यापासून सुरू होणार आहे. टेक कंपनी इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पने देखील नोकर भरती थांबवत असून, आयबीएम सुमारे ७८००० कर्मचाऱ्यांना काढण्याच्या विचारात आहे.