Home / News / केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबाचा चौथा रुग्ण

तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

तिरुवनंतपुरम – केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या दुर्मिळ अमिबाचा (अमिबिक मेनिंगोएन्सेफलाइटीस) संसर्ग झालेला आणखी एक रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण हा १४ वर्षांचा मुलगा असून तो उत्तर केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील पायोली येथील रहिवासी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी एका रुग्णाची नोंद झाल्याने अमिबा संसर्ग बाधितांची संख्या आता ४ वर पोहोचली आहे.

या नव्या रुग्णावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरने सांगितले की, “या मुलाला १ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती आता सुधारत आहे. आज त्याला संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तत्त्काळ त्याच्यावर परदेशातील औषधांचे उपचार सुरु करण्यात आले.” दरम्यान, अमिबा हा दुर्मिळ मेंदूचा संसर्ग दुषित पाण्यात आढळणाऱ्या मुक्त-जिवंत अमिबामुळे होतो. याआधी ३ जुलै रोजी कोझिकोड येथील खासगी रुग्णालयात एका १४ वर्षांच्या मुलाचा या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. त्यापूर्वी मलप्पूरममधील ५ वर्ष आणि कन्नूरमधील १३ वर्षांच्या मुलीचा अनुक्रमे २१ मे आणि २५ जून रोजी याच संसर्गाने मृत्यू झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या