देहरादून
खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रेचे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहे. देहरादून जिल्ह्याचे एसएसपी दिलीप सिंह कुंवरांनी भाविकांना संयम बाळवण्याचे आवाहन केले आहे. सध्या केदारनाथ मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार बर्फवृष्टी सुरू असून दिलीप सिंह ऋषिकेश येथे पोहोचले. तेथे त्यांनी यात्रेच्या कॅम्प परिसराचे निरीक्षण केले. तेथील खराब हवामानाबाबत भाविकांसोबत सखोल चर्चा केली. त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या. त्यानंतर दिलीप सिंह यांनी केदारनाथ यात्रेचे बुकिंग 30 एप्रिलपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला.
केदारनाथ यात्रेचे रविवारपर्यंत बुकींग बंद
