Home / News / केदारनाथवर बर्फाची चादरतापमान उणे १८ अंशावर

केदारनाथवर बर्फाची चादरतापमान उणे १८ अंशावर

केदारनाथ – उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेमुळे केदारनाथच्या परिसरात सर्वत्र बर्फाची जाड चादर पसरली असून या भागातील तापमान उणे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

केदारनाथ – उत्तर भारतात सुरु असलेल्या थंडीच्या लाटेमुळे केदारनाथच्या परिसरात सर्वत्र बर्फाची जाड चादर पसरली असून या भागातील तापमान उणे १८ अंश सेल्सिअसवर गेले आहे.केदारनाथ यात्रा बंद असली तरी या ठिकाणी अनेक ठिकाणी सध्या विकासकामे सुरु आहेत. जोरदार बर्फवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून ही कामे थांबली असून सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. केदारनाथ, मदमहेश्वर, तुंगनाथ सह पर्वतीय भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. कालपासूनच येथील वातावरण कमालीचे थंड झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे तापमान ९ अंश सेल्सिअस असले तरी केदारनाथमध्ये ते शून्याखाली १८ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्रियुगीनारायण, गौरीकुंड, चौमासी, गौण्डर रासी, गजगू, देवरियाताल, कार्तिक स्वामी, मोहनखाल या भागातही जोरदार बर्फवृष्टी होत आहे. येथील सर्व पर्वत हिमाच्छादित झाले असून झाडांवर बर्फ साचल्याने ती पांढरी शुभ्र झाली आहेत. या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. सध्या अनेक पर्यटक धनोल्टी, काणाताल, डांडाचली मध्ये बर्फाचा आनंद घेत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या