डेहराडून: उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध तिर्थक्षेत्र केदारनाथ धाम यात्रा २५ एप्रिलपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरु असताना, केदारनाथची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याचा हेलिकॉप्टरच्या धडकेत मृत्यू झाला. अमित सैनी असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे आर्थिक नियंत्रक होते. हेलिकॉप्टरच्या पाठीमागे असलेला पंखा लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
२५ एप्रिलपासून केदारनाथ धाम यात्रा सुरू होत आहे. याच यात्रेनिमित्त अमित सैनी हे केदारनाथ हेलिपॅडची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधून खाली उतरताना त्यांची हेलिकॉप्टरच्या पंख्याला धडक बसली आणि चॉपरच्या मागील ब्लेडने गळा कापल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा उत्तराखंड सिव्हिल एव्हिएशनचे सीईओही तिथे उपस्थित होते.