चमोली – केदारनाथ मार्गावर ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बळी गेलेल्यापैकी तीन जणांचे मृतदेह आज सापडले. दरडी कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होऊन अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. स्थानिकांनी या म़ृतदेहाची माहिती राज्य आपत्ती निवारण दलाला दिल्यानंतर त्यांनी दगडांखाली दबलेले हे मृतदेह बाहेर काढले. यातील एका म़ृतदेहाची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख पटलेली नाही. ढिगाऱ्याखाली आणखीही काही मृतदेह असल्याच्या शक्यतेमुळे पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.३१ जुलै रोजी केदारनाथ च्या पायी मार्गावर ढगफुटी झाली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून हा मार्ग बंद झाला होता. यावेळी केदारनाथकडे जात असलेल्यापैकी अनेक यात्रेकरु बेपत्ता झाले होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेलल्यांचा आकडा ९ वर पोहोचला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |