नवी दिल्ली – कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आजही निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.केजरीवाल यांनी न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेद्वारे त्यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या याचिकेत जामिनावर मुक्त करण्याची विनंती केली आहे.केजरीवाल यांच्या जामिनाबाबतच्या याचिकेवर आज न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्जल भुईया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीआयच्या वतीने अतिरिक्त महाधिवक्ता ए एस राजू यांनी युक्तिवाद केला. तर केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.जामिनावर मुक्तता केल्यास या खटल्यातील बहुतेक साक्षीदार उलटण्याची शक्यता आहे असे सांगत राजू यांनी जामिनास विरोध केला. तर जगण्याचा अधिकार विचारात घेता जामीन मंजूर करावा,असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |