नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पार्टीने एका पाठोपाठ एक आश्वासनांचा धडका लावला असून यात आता आणखी एका आश्वासनाची भर पडली आहे. निवडणुकीनंतर दिल्लीकरांची चुकीची पाणी बिले माफ करण्याचे आश्वासन आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज दिले.अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ते म्हणाले की, ज्यांना चुकीचे पाणी बिल आले आहे, त्यांना ते भरण्याची गरज नाही. निवडणुकीनंतर त्यांचे हे बिल माफ केले जाईल. दिल्लीत आमचे सरकार गेल्या दहा वर्षांपासून मोफत पाणी देत आहे. मात्र मी तुरुंगात गेल्यानंतर यांनी काहीतरी गडबड केली. त्यामुळे आता लोकांना हजारो रुपयांची बिले येत आहेत. ज्यांना ज्यांना ही बिले आलीत त्यांनी ती भरु नयेत. त्यांनी थोडे दिवस कळ सोसावी. आपचे सरकार पुनहा आल्याबरोबर ही बिले माफ केली जातील.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |