नवी दिल्ली – सीबीआय प्रकरणी राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. आप नेते दुर्गेश पाठक आणि इतरांना मात्र जामीन मंजूर करण्यात आला.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने आप नेते दुर्गेश पाठक आणि इतरांना १ लाख रुपयांच्या जामीनाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जारी केलेल्या समन्सवर तो हजर झाला होता.तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि इतर ताब्यात घेतलेल्या आरोपींना तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.त्याआधी
दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता यांनी सोमवारी सांगितले की,’आप’ने संविधानाचे उल्लंघन केले आहे.भाजप आमदारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवून आप सरकारने संविधानाचा कथित भंग केल्याप्रकरणी सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार होते.