नवी दिल्ली – मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जमिनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.उच्च न्यायालयाने ५ ऑगस्ट रोजी केजरीवाल यांच्या अटकेला वैध ठरवले होते. सीबीआयची कारवाई योग्य असली तरी त्यांना या प्रकरणात नियमित जामिनासाठी स्थानिक न्यायालयात जाण्यास सांगितले होते. त्यांनतर सीबीआयकडून झालेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका करण्यात आली आहे.ईडीच्या कारवाईप्रकरणी केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. मात्र सीबीआयने केलेली अटक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केजरीवालांच्या जामिनावर २० ऑगस्टला सुनावणी
