नवी दिल्ली – आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज दुपारी जोरदार शक्तीप्रर्दशन करत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला. त्यासोबत त्यांची पत्नी आणि आपच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्ते होते. या मतदारसंघात केजरिवाल यांचा सामना भाजपाचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्याशी होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अरविंद केजरीवाल माध्यमांना सांगितले की,मी उमेदवारी अर्ज दाखल केला. मी दिल्लीतील लोकांना सांगू इच्छितो की, कृपया कामाला मत द्या. एकीकडे एक पक्ष आहे जो काम करतो आणि दुसर्या बाजूला फक्त राजकारण करणारा पक्ष आहे.त्यामुळे कामाला मतदान करा. दिल्लीत पाणी आणि रस्त्यांबाबत आम्हाला खूप काम करणे बाकी आहे,म्हणून मला आशा आहे की, लोक कठोर परिश्रम करणार्यांना मतदान करतील. भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि कोणतेही व्हिजन नाही.
केजरीवालांचे शक्तीप्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल
