नवी दिल्ली – केंद्र सरकारने काल कोचिन शिपयार्ड कंपनीचे ५ टक्के शेअर विकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १ हजार ५४० रुपये प्रतिशेअर किंमतीवर हे शेअर विकले जाणार असून त्यातून २ हजार कोटी रुपयांची उभारणी करण्यात येणार आहे. उद्यापासून कोचिन शिपयार्डचे कामगार, किरकोळ गुंतवणूकदारांसाठीही हे शेअर उपलब्ध होणार आहेत. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांता पांडे यांनी एक्स वर या निर्णयाची घोषणा केली.केंद्र सरकारने आपल्याकडी ६५ पूर्णांक ७७ लाख म्हणजेच अडीच टक्के शेअर विकण्याचा निर्णय घेतला असून यात अतिरिक्त अडीच टक्के शेअरही उपलब्ध होतील. या शेअरच्या विक्रीतून २००० कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. मुंबई शेअर बाजारात सुमारे ३ टक्के वाढीसह या शेअरची निर्धारित किंमत ही १ हजार ६७२ रुपये प्रतिशेअर अशी असून त्यावर ८ टक्के सवलत देण्यात येणार आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेड मध्ये केंद्र सरकारचा ७२ पूर्णांक ८६ टक्के हिस्सा आहे.