Home / News / केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळी भेट मिळाली असून मंत्रीगटाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या आधी ४२ टक्के असलेला हा महागाई भत्ता आता ४५ टक्के झाला आहे.महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलैपासून लागू होणार असून त्याचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या वेतनात ३ महिन्याची थकबाकीही मिळणार आहे. याचा लाभ देशभरातील १ कोटी १५ लाख कर्मचारी व पेन्शनधारकांना मिळणार आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ होत असते. या वर्षीच्या जुलै महिन्यात या वाढीची घोषणा करण्यात आली नव्हती ती आज दिवाळीच्या आधी करण्यात आली आहे.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या