कराड – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार आहेत. या दौर्याच्या माध्यमातून भाजपा कराड तालुक्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.
दुपारी ३ वाजता कराड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्यामंदिरच्या पटांगणावर जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठातही विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.