कोल्हापूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्यापासून (२४ आणि २५ सप्टेंबर) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात ते नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरमधील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. शाह यांचा या महिन्यातील हा दुसरा दौरा आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
