केंद्रिय माहिती प्रसारण खात्याचा
अॅमेझॉनशी करार! प्रशिक्षण देणार

नवी दिल्ली – केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय आणि एमेझॉन यांच्यात नुकताच एक करार झाला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म भारतीय चित्रपट उद्योगाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यात अधिकाधिक प्रगती करण्यासाठी.अमेझॉन एफटीआयआय आणि एसआरएफटीआय च्या विद्यार्थ्यांना याबाबतचे प्रशिक्षण आणि इंटर्नशिप प्रदान केली जाणार आहे. त्यामुळे तरुणांना कला आणि मनोरंजन क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी ओटीटीवर अधिकाधिक होत असलेल्या अश्लील आणि असभ्यतेवर देखील त्यांनी ताशेरे ओढले.

Scroll to Top