Home / News / कॅलिफोर्नियातील भीषण वणव्यात ७१ हजार एकर जंगल जळून खाक

कॅलिफोर्नियातील भीषण वणव्यात ७१ हजार एकर जंगल जळून खाक

कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात बुधवारी पेटलेल्या वणव्याने उग्र रूप धारण केले आहे. हा वणवा पसरण्याचा वेग एवढा अफाट आहे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कॅलिफोर्निया – अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात बुधवारी पेटलेल्या वणव्याने उग्र रूप धारण केले आहे. हा वणवा पसरण्याचा वेग एवढा अफाट आहे की अवघ्या चोवीस तासांत सुमारे ७१ हजार एकरवरील जंगल जळून खाक झाले.यावर्षातील हा सर्वात मोठा वणवा मानला जात आहे.प्रशासनाने बट आणि तेहमा प्रांतातील लोकांना तत्काळ घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे. सुदैवाने या वणव्यात आतापर्यंत जिवीतहानी झालेली नाही.अज्ञात व्यक्तिंनी केलेल्या जाळपोळीमुळे हा वणवा पेटला आणि बघता बघता सर्वदूर पसरला.काही वसाहती या वणव्यात भस्मसात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिसरात रहिवाशांना घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे,असे बट काउंटीच्या अग्निशमन दलातील अधिकारी रिक कारहार्ट यांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या