मुंबई – शालोपयोगी साहित्य आणि जलरंगांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
दांडेकर त्यांच्या पार्थिवावर दुपारी ३.३० वाजता दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा आशिष, मुलगी अनघा असा परिवार आहे. त्यांच्या पत्नी रजनी यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले.
शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती करणारी कॅम्लिन ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे कंपनीची धुरा वाहिली. कॅम्लिनचा पसारा वाढवताना त्यांनी मूल्यांशी तडजोड केली नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताला आणि श्रमाला त्यांनी कायम महत्त्व दिले. कलर्स कंपनी क्षेत्रात बहुमूल्य योगदानाबद्दल दांडेकर यांना कलर्स सोसायटीतर्फे २०१८ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.