वॉशिंग्टन -अमेरिकेच्या मिसुरी राज्यातील कॅन्सस सिटी बारमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचवेळी अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेला. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. क्लायमॅक्स लाउंजमध्ये ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी रात्री दीड वाजता बार बंद होण्याच्या काही वेळापूर्वीच या घटनेची माहिती मिळाली. ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता, दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एक व्यक्ती बारच्या आत आणि एक जण इमारतीच्या बाहेर मृत अवस्थेत सापडले. तर तिसऱ्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.