ओटावा – कॅनडामध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कॅनडाने स्टडी परमिटची मंजुरी ५० टक्क्यांनी कमी केली आहे. स्थलांतरित नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी जस्टिन ट्रुडो सरकारने कडक पावले उचलली आहेत.त्यामुळे व्हिसा मंजुरीचा स्तर पुन्हा एकदा २०१८ आणि २०१९ च्या पातळीवर नेण्याचा अंदाज आहे.
यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत भारतीय विद्यार्थ्यांची स्टडी परिमिटची मंजुरी निम्म्यावर आली आहे.अप्लाईबोर्ड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठ आणि कॉलेजशी जोडते,असा अंदाज वर्तवण्यात येतोय की कॅनडात २०२३ च्या तुलनेत २०२४ च्या स्टडी परमिट मंजुरीत ३९ टक्क्यांची घट होईल.त्यामुळे अन्य देशांतून कॅनडात शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पहिल्यासारखे कॅनडामध्ये आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे स्वागत होणार नाही.या कंपनीच्या अहवालानुसार, कॅनडामध्ये २०२४ च्या अखेरपर्यंत स्टडी परमिटची संख्या २ लाख ३१ हजार पेक्षा थोडी कमी असेल. २०२३ मध्ये ४ लाख ३६ हजार स्टडी परमिट देण्यात आले होते.