- ३० हजार लोक बेघर
ओटावा- कॅनडातील अल्बर्टा जंगलात लागलेल्या भीषण आगीमुळे ३० हजार लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. काल सायंकाळपर्यंत १०८ ठिकाणी जंगलातील विविध भागात आग लागली होती. त्यापैकी ३१ ठिकाणची परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्याचे सागण्यात आले आहे.अल्बर्टाच्या वाइल्ड फायर युनिटच्या माहिती अधिकारी क्रिस्टीज टकर यांनी ही माहिती दिली. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर आणि एअर टँकरचा वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या परिसरातून सुटका करण्यात आलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.दरम्यान अल्बर्टा प्रांतात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे .
क्रिस्टीज यांच्या माहितीनुसार, धूर आणि आगीमुळे मालमत्तेचे किती नुकसान झाले याची माहिती देणे कठीण होईल. ते म्हणाले की, आता आमचा उद्देश लोकांचे प्राण वाचवणे आहे.पाऊस असूनही त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. यावरून जंगलातील आगीचा धोका किती आहे, याचा अंदाज लावता येतो. पर्यावरणावर काम करणाऱ्या एरिन स्टॉन्टन यांनी सांगितले की, आगीवर याचा फारसा परिणाम होणार नाही.त्याचबरोबर आगीचा सामना करण्यासाठी संपूर्ण अल्बर्टा राज्यात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.अल्बर्टाचे प्रीमियर डॅनियल स्मिथ म्हणाले की, आगीत आतापर्यंत ३ लाख एकर क्षेत्र जळून खाक झाले आहे. सर्वात जास्त प्रभावित क्षेत्र ड्रेटन व्हॅली सांगण्यात येत आहे.ताशी १४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आग वेगाने पसरत आहे.