टोरांटो – कॅनडाच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांची नियुक्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅनडात २०१९ पासून खासदार म्हणून निवडून येणाऱ्या अनिता आनंद यांची निवड सत्ताधारी लिबरल पक्ष करु शकतो अशी चर्चा कॅनडाच्या प्रसार माध्यमांमध्ये सुरु आहे.पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या आधी त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. अनिता आनंद या लिबरल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या असून त्यांनी ट्रुडो सरकारमध्ये सार्वजनिक सेवा, राष्ट्रीय संरक्षण आदी महत्त्वाची खाती सांभाळलेली आहेत. अनिता आनंद या व्यवसायाने वकील असून त्यांचे वडील तामिळनाडूतील तर आई पंजाबी आहे. क्वीन्स विद्यापीठातून राज्यशास्त्रातील पदवी मिळवलेल्या अनिता यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून न्यायशास्त्र तर डलहौसी विद्यापीठातून कायदा विषयातील पदवी घेतली. टोरंटो विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |