नवी दिल्ली :
अमेरिकन अनेक कृषी उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याच्या भारताच्या अलीकडील निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केले आहे. गेल्या आठवड्यात भारताने गोठवलेल्या टर्की, फ्रोझन डक, फ्रेश ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी, फ्रोझन ब्लूबेरी आणि क्रॅनबेरी, तसेच प्रक्रिया केलेल्या ब्लूबेरी आणि क्रॅनबेरीसह काही अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करण्यास सहमती दर्शविली.अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुल्क कपातीमुळे अमेरिकन कृषी उत्पादकांसाठी भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत आर्थिक संधी वाढतील आणि युनायटेड स्टेट्समधून अधिक उत्पादने भारतातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
भारताच्या घोषणेचे स्वागत करताना अमेरिकेचे कृषी सचिव टॉम विलसँक म्हणाले की, या निर्णयामुळे अमेरिकन उत्पादक आणि निर्यातदारांसाठी भारतीय बाजारपेठेच्या नवीन संधी निर्माण होतील.भारताने नुकत्यात घेतलेल्या निर्णयाने अमेरिकन सफरचंद, चणे, मसूर, बदाम आणि अक्रोड यावरील प्रत्युत्तरादाखल लागू केलेले शुल्क काढून टाकले आहे. भारतीय बाजारपेठेत पोहोचणाऱ्या यूएस कृषी उत्पादनांसाठी महत्त्वपूर्ण टॅरिफ आणि नॉन-टेरिफ अडथळे कायम आहेत.सिनेटर एमी क्लोबुचर यांनी एका ३० टक्क्यांवरून पाच टक्के केले जाईल. बऱ्याच काळापासून उच्च शुल्कामुळे अमेरिकन टर्की शेतकऱ्यांना त्यांची उत्पादने भारतात निर्यात करण्यापासून रोखले गेले होते. मला आनंद आहे की हा करार झाला. एका वेगळ्या निवेदनात, सिनेटर्स मार्क वॉर्नर आणि टिम केन म्हणाले की, या निर्णयामुळे व्हर्जिनिया पोल्ट्रीची मागणी वाढताना खोऱ्यातील आर्थिक व्यवहारांना पाठिंबा देताना भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी मजबूत होण्यास मदत होईल.