नवी दिल्ली
ट्विटरला देशी पर्याय असलेल्या ‘कू’ ॲपने ३० टक्के कर्मचारी कपात केली आहे. हे एक मायक्रोब्लॉगिंग ॲप आहे. महसुलात तोटा आणि निधी उभारण्यास असमर्थता या कारणांमुळे कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. या तीन वर्षे जुन्या ॲपने सुमारे २६० कामगारांपैकी ३० टक्के कामगारांना कामावरून काढून टाकले आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
सध्या जगभरातील वाढीपेक्षा कार्यक्षमतेवर अधिक भर दिला जात आहे. कंपन्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची अधिक गरज आहे. सुरुवातीला, ट्विटर आणि सरकारमधील वादामुळे या बंगळुरूस्थित कंपनीला फायदा झाला. मात्र, वापरकर्ते पुन्हा ट्विटरवर जाऊ लागल्याने कंपनीच्या अडचणी वाढू लागल्या, असेही ते म्हणाले.