Home / News / कुलगामला ५ दहशतवादी ठार! २ जवान जखमी

कुलगामला ५ दहशतवादी ठार! २ जवान जखमी

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील बेहिबाग पीएस भागातील कद्देर गावाजवळ दहशतवादी आणि संरक्षण दलांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने...

By: E-Paper Navakal

श्रीनगर – कुलगाम जिल्ह्यातील बेहिबाग पीएस भागातील कद्देर गावाजवळ दहशतवादी आणि संरक्षण दलांमध्ये आज चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने पाच दहशतवाद्यांना ठार केले. यात दोन जवान जखमी झाले आहेत. कद्देरमध्ये काल संशयित दहशतवाद्यांची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर संरक्षक दलाने परिसरात शोध घेत घेराबंदी केली होती. लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या एक्स पोस्टवर नमूद माहितीनुसार दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. या चकमकीत यासिर जावेद, आदिल हजाम, मुश्ताक इटू, इरफान लोन, आसिफ शेख या दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडून साहित्य, शस्त्रे व दारूगोळा जप्त केला.

Web Title:
संबंधित बातम्या