कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्ता ‘साशा’चा मृत्यू

भोपाळ – नामोबिया येथून कुनो राष्ट्रीय उद्यानात आणलेल्या मादी चित्ता ‘साशा’चा मृत्यू झाला. हा चित्ता किडनीच्या संसर्गाने त्रस्त असल्याचे आढळून आले होते. 22 जानेवारी 2023 रोजी वैद्यकीय चाचणीत चित्ताला किडनीत संसर्गाचा आजार आढळून आला. खाणे देखील कमी झाल्याने चित्ता अशक्त झाला होता. या चित्ताच्या देखरेखीसाठी कुनोमध्ये तीन डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले होते. हे डॉक्टर आजारी चित्तावर उपचार करत होते. मात्र हा चित्ता मृत्यू झाल्याचे कुनो राष्ट्रीय उद्यानाने आज कळवले. 17 डिसेंबर रोजी खास विमानाने 8 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये नामोबियाहून आणले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या चित्तांना कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडले होते.

Scroll to Top