भोपाळ – कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांपैकी ‘दक्षा’ नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य वनसरंक्षक जे. एस. चौहान यांनी आज दिली. गेल्या २ महिन्यांतील हा तिसऱ्या चित्त्याचा मृत्यू आहे.
मंगळवारी सकाळी अकरा वाजताच्या मिनिटांनी दक्षा निरीक्षण पथकाला जखमी अवस्थेत आढळली. उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजता दक्षाचा मृत्यू झाला. बहुधा नर चित्त्यांशी तिची झटापट झाली असावी.