कुनो:- नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते भारतात स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांच्या मृत्यूंचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. साशा, उदय आणि दक्षा यांच्यानंतर मंगळवारी अवघ्या दोन महिन्याच्या बछड्यानेही आपला जीव गमावला आहे.
ज्वाला मादीने २४ मार्च रोजी चार पिल्लांना जन्म दिला होता. त्यापैकी एक बछडा मागील काही दिवसांपासून आजारी होता. मंगळवारी त्याची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मार्चमध्ये मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला. त्यानंतर एप्रिलमध्ये उदय नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मादी चित्ता दक्षाचा मृत्यू झाला. यापैकी दोन चित्ते दक्षिण आफ्रिकेतून आणले होते. सप्टेंबर २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुनो येथे सोडले होते.