भोपाळ -मादी चित्ता साशाच्या मृत्यूला अवघे दोन दिवस झाले आहेत. त्यानंतर आता कुनो नॅशनल पार्क येथे मादी चित्ता सियायाने चार बछडयांना जन्म दिल्याची एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विट करून चित्ता प्रकल्प टीमचे अभिनंदन केले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी तीन मादी आणि दोन नर चित्ते उद्यानात सोडण्यात आले होते. कुनो नॅशनल व्यवस्थापनाला 20 दिवसांपूर्वी मादी चित्ता सियायाच्या गर्भधारणेची माहिती मिळाली होती. तेव्हापासून तिला विशेष निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेल्या 8 चित्त्यांना कुनो येथे सोडले होते. त्यांना 50 दिवस लहान भागात ठेवल्यानंतर मोठ्या बंदोबस्तात हलवण्यात आले.
कुनो उद्यानात चित्ता सियायाने दिला चार बछड्यांना जन्म
