देवगड – पारंपारिक रापण महोत्सव समिती कुणकेश्वर कुणकेश्वर कातवण, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर व कातवण ग्रामपंचायत, कुणकेश्वर विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी,देवगड तालुका व्यापारी पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ८ नोव्हेंबर ते सोमवार ११ नोव्हेंबर या कालावधीत ‘रापण महोत्सव- २०२४’ चे आयोजन कुणकेश्वर येथे करण्यात आले आहे.
या रापण महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.यावर्षी होणाऱ्या रापण महोत्सवात सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या रापण महोत्सवामध्ये
ढोलपथक वादन, मान्यवरांचे सत्कार,दिंडी संगीत कार्यक्रम, राज्यस्तरीय सोलो रेकॉर्ड डान्स स्पर्धा आणि इतर कार्यक्रम होणार आहेत.