सावंतवाडी – तालुक्यातील कुणकेरी लिगाचीवाडी येथील दत्त मंदिरात येत्या शनिवारी ७ डिसेंबरपासून २७ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दत्त जयंती दिवशी शनिवारी १४ डिसेंबरला या पारायणाची सांगता होणार आहे.
रामचंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणास प्रारंभ होणार आहे.यानिमित्त दत्त मंदिरात दररोज पहाटे ४ वाजता अभंग गाथास्यानंतर पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराज पूजन सोहळा आणि हरिपाठ, सकाळी ८ वाजल्यापासून श्री ज्ञानेश्वरी वाचन तसेच पारंपरिक भजने होणार आहेत. शनिवारी ७ डिसेंबरपासून पुढील सात दिवसांत विविध भजन मंडळांची भजने,श्री दत्त नामस्मरण १००० जप, हरिपाठ होणार आहे.तसेच दत्त जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी बारा वाजता दत्त जन्मोत्सव दिंडी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.