प्रयागराज -प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात रविवारी पहिले बाळ जन्मले आहे. या मुलाचे नाव कुंभ असे ठेवण्यात आले आहे. याच रुग्णालयात दुसर्या दिवशीही एक मुलगी जन्माला आली. तिचे गंगा असे नामकरण करण्यात आले आहे. प्रयागराजमध्ये १८ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी तयारी केली आहे. यासाठी एका तात्पुरत्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवण्यात आल्या असून त्यात एक बाह्यरुग्ण विभाग, सामान्य वॉर्ड, प्रसुतीगृह, ऑपरेशन थिएटर व अतिदक्षता विभागाचा समावेश आहे. या रुग्णालयाचा वापर सुरू झाला असून या रुग्णालयात दोन दिवसांत दोन चिमुकल्यांचा जन्म झाला. प्रशासनानेही त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कुंभमेळ्यासाठीच्या रुग्णालयात पहिले बाळ जन्मले! नाव कुंभ
![](https://navakal.in/wp-content/uploads/2024/12/kubha.jpg)